• आता महाराष्ट्राच सराव पोर्टल आपल्या हातात

महाराष्ट्र सरकारने सर्व क्लास 3 व 4 च्या भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी एक पोर्टल पण विकसित केले आहे परंतु सदर परीक्षेसाठी सराव करण्यासाठी कुठल्याच प्रकारची पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
सदर बाब लक्षात घेऊन आम्ही सराव परीक्षा संच व पोर्टल आपल्या सेवेत सादर केला आहे.

महापरीक्षेचा सराव आता कुठेही आणि केव्हाही...

आमचे प्रश्नसंच

Loading

उद्देश

केवळ भरपूर अभ्यास केला म्हणजे यश मिळत नाही तर यश मिळवण्यासाठी अभ्यासाला योग्य दिशा मिळाली पाहिजे आणि अभ्यास झाला आहे किवा नाही यासाठी योग्य वातावरणात परीक्षा देऊन पहिली पाहिजे आणि त्यातून अजुन किती तयारी बाकी आहे ह्याचा बोध घेतला पाहिजे. हा उद्देश समोर ठेऊन आम्ही xerox पेक्षाही कमी दरात ऑनलाइन प्रश्न पत्रिका विद्यार्थ्याना उपलब्ध करून सरावाची संधी दिली आहे. ह्यामधे तुम्हाला भरपूर सराव झाल्या मुळे ऐन परीक्षेच्या काळात येणारा मानसिक तणाव येणार नाही.

वेळेचे नियोजन संगणकावरच्या स्क्रीन वरील प्रश्न सोडवताना वेगवेगळ्या बटन्स उदा. सेव अँड नेक्स्ट, मार्क फॉर रिव्यू इत्यादी बटन्स ची सवय होईल, कोणता सेक्शन्‌/ विभाग केव्हा सोडवावा ह्याचा अचूक अंदाज येईल थोडक्यात आपण केलेल्या मेहनती चा हा परिपाक आहे.

आमच्याविषयी

महाराष्ट्र शासनाने वर्ग 3 व वर्ग 4 या पदांच्या निवडीकरिता पारंपारिक पद्धत बंद करून आता अत्यंत पारदर्शक अशी ऑनलाइन टेस्ट घेण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने बाजारात अनेक प्रकारच्या प्रकाशनाची मार्गदर्शनपर पुस्तके उपलब्ध झाली आहेत परंतु एखाद्या परीक्षेचे स्वरुप पाहिले असता त्या परीक्षा पद्धतीनुसार आपला सराव असणे आवश्यक आहे. आम्हाला वाटले जर परीक्षाच ऑनलाइन असेल तर ऑफलाइन सरावाचा फायदा काय? म्हणून महाराष्ट्र शासनाच्या या नावीन्यपूर्ण परीक्षा पद्धतीपर्यन्त  तंतोतंत पोहचण्यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न.

ह्या परीक्षा देणारा मोठा वर्ग हा ग्रामीण भागातील असल्याकारणाने ग्रामीण भागातील परीक्षार्थीना ऑनलाइन परीक्षेचे स्वरुप क्वचितच माहिती असते किवा त्याना सराव भेटणे अशक्यच आहे. अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांजवळ ही परीक्षा पद्धत पोहचवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आम्ही समजतो.

आशा करतो की हा उपक्रम आपण आपल्या जवळील युवकांपर्यंत आणि परीक्षार्थ्यापर्यन्त पोहचवाल व त्याद्वारे सर्व बांधव ह्याचा लाभ घेऊ शकतील.

आमचे वैशिष्ठ्य


आपले प्रश्न व त्यांचे योग्य उत्तर आणि आवश्यक तिथे स्पष्टीकरण टेस्ट झाल्या वर तत्काळ भेटतील.

प्रत्येक टेस्ट मधे मिळालेले गुण तुम्हाला टेस्ट संपल्याबरोबर लगेच दिसतील.

तुम्हाला मिळालेल्या गुणानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तुमचा गुणानूक्रम दिसेल व जसे जसे विद्यार्थी परीक्षा देत जातील त्यानुसार तुमचा गुणानूक्रम बदलत जाईल. ही टेस्ट विद्यार्थ्याला 2 वेळा देता येईल परंतु पहिला प्रयत्नच गुणानूक्रमासाठी ग्राहय धरला जाईल.

मग तयार राहा आपला गुणानूक्रम संपूर्ण महाराष्ट्रातून कितवा येईल हे जाणून घेण्यासाठी.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वेबसाइट चा उद्देश ?

जास्तीत जास्त विद्यार्थ्याना अत्यंत वाजवी दरात परीक्षाभिमुख सराव प्रश्न पत्रिका व वातावरण पुरवणे

 टेस्ट सिरीज कशी ऑर्डर करायची?

विद्यार्थ्यानी ई मेल आयडी द्वारे व मोबाइल क्रमांकाचा वापर करून अकाउंट मधे लॉग इन करावे.

ई मेल आयडी त लॉग इन करून आलेल्या लिंक वर क्लिक करून अकाउंट अक्टिवेट करावा.
त्यानंतर हव्या त्या कोर्सस वर क्लिक करून रक्कमेची पूर्तता करावी.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अकाउंट वर तत्काळ सराव परीक्षा दिसू लागतील. 

टेस्ट सिरीज नंतर पडलेल्या प्रश्नाची उत्तरे कशी मिळवायची?

ऑनलाइन परीक्षेच्या शेवटी प्रत्येक प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण राहील.तसेच DISCUSSION टॅब राहील तिथे तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता.  काही शंका असतील तर आम्ही त्या दूर करू.

टेस्ट सिरीज ची वेळ?

ऑनलाइन परीक्षेच्या रक्कमेची पूर्तता केल्यानंतर विद्यार्थी कुठल्याही वेळी परीक्षा देऊ शकतात आणि 2 वेळा देऊ शकतात परंतु पूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्याचा मेरिट क्रमांक दर्शवण्यासाठी फक्त पहिला प्रयत्न च ग्राह्य धरला जाईल.

WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
MHPARIKSHA@GMAIL.COM
CALL
                +91-7719971993
ADDRESS
EDIFIED
Gold Ace building,
kharadi bye pass,
Pune- 411014

MAHARASHTRA

Social Links